झरी तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देण्याचे आवाहन

झरी, दि. 25 : झरी तालुक्यात सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी शेतं पाण्याखाली गेली आहेत. मोठ्या खर्चाने केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

या परिस्थितीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी झरी तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने अध्यक्ष संदिप बुर्रेवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, झरी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन बुर्रेवार यांनी शेतकरी बांधव व कार्यकर्त्यांना केले आहे.

या निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करणे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे व थकबाकी वीजबिल माफ करणे व शेतकऱ्यांशी संबधीत प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसकडून उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असून या कार्यक्रमाला शेतकरी व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Comment