जागतिक फार्मसिस्ट दिनानिमीत शालेय मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर

वैद्यकीय क्षेत्रातील फार्मसीस्टचे योगदानाचे कौतुक करण्याचे उद्देशाने दरवर्षी २५ सप्टेंबर ला जागतीक फार्मसीस्ट दिन साजरा करण्यात येतो यावर्षी जागतीक फार्मसीस्ट दिनाचे औचित्य साधुन सामाजीक उपक्रम म्हणून केमीस्ट & ड्रगीस्ट असोसिएशन तालुका झरीजामणी च्या वतीने दि.२५.०९.२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा झरीजामणी येथे शालेय मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक म्हणुन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन मार्कंड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार पोलीस स्टेशन पाटण श्री.स्वप्निल ठाकरे तसेच प्रमुख पाहुणे तथा शिबीराकरीता लाभलेले डॉ. सुमय्या शेख,डॉ. सुरेखा बडोदेकर, डॉ. सिमरन शेख,डॉ. शाहीन शेख हे होते.शिबीरात अध्यक्ष यांनी फार्मसीस्ट यांचे  योगदाना बद्दल माहिती दिली तसेच असोसिएशनचे अध्यक्ष शेख मुजीम यांनी जागतीक फार्मसीस्ट दिना बद्दल प्रस्तावना केले शिबिराचे सुत्रसंचालन दिनेश पिपाडा  यांनी केले शिबिरात  महीला डॉक्टंराकडुन आश्रम शाळा व राजीव विद्यालय झरी येथील शालेय मुलींचे आरोग्य तपासणी,मार्गदर्शन व मोफत औषधी व फळ आणी बीस्कीटाचे  वाटप करण्यात आले आहे शिबिराला  केमीस्ट & ड्रगीस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष शेख मुजीम, उपाध्यक्ष गजेंद्र दरबेशवार, सचिव सुशिल मालेकर, जिल्हा सदस्य विनोद बोळकुंटवार,तसेच तालुका सदस्य दिलीप पालीवाल, दिनेश पिपाडा, नरेश कासावार, रामानंद मोहीतकार,नविन गुम्मडवार,प्रफुल बोबडे,शुभम ढोले,किशोर कोठारी, रवींद्र कुर्मावार तसेच विजया रामगीरवार मँडम ,सोयाम मँडम ,वाघाडे मँडम गायकवाड मँडम उर्वते मँडम यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment