श्री गजानन महाराज महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम

Zari/,Mukutban: श्री गजानन महाराज महाविद्यालय, मुकुटबन येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. देशात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे, त्याचे महत्त्व लक्षात घेत महाविद्यालयात परिसर स्वच्छ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसर तसेच बाहेरील परिसर स्वच्छ केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि इतरांनाही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भास्कर घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावले. कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. अभिजीत आवारी, प्रा. डॉ. सिद्धराम मुंडे, प्रा. डॉ. अनंता सूर, प्रा. डॉ. श्याम बोदकूरवार आणि प्रा. रजनी ढेंगळे यांनीही विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. सुरेश भालेराव यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment