श्री गजानन महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

Zari jamani/Mukutban गजानन महाराज महाविद्यालय मुकुटबन येथे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन उत्साहपूर्ण कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. यावेळी NSS स्वयंसेवकांनी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वाढवण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घरोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अभिजीत आवारी, प्रा. डॉ. सिद्धराम मुंडे, प्रा. डॉ. अनंता सूर, प्रा. डॉ. श्याम बोदकुरवार, प्रा. कु. रजनी ढेंगळे आणि श्री दत्तू अंगिलवार उपस्थित होते.

महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना NSS चा उद्देश, महत्त्व आणि विद्यार्थीदेखील समाजसेवा कशी करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संजय घरोटे यांनी विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश भालेराव यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन कुमार पठाण यांनी केले. आभार प्रदर्शन कुमारी संदर्लावर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NSS स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment